Posts

Showing posts from November, 2022

गगन सदन

 लहानपणी 'अपूर्वाई' वाचल्यापासून मनात विमान प्रवासाचं आकर्षण होतं, आपण पण कधी तरी विमानात बसू का, आपण पण कुठेतरी बाहेर जाऊ का हे विचार पुलंचा एकंदर इंग्लंडप्रवास वाचून सतत मनात यायचे. दैवयोगाने पुढे अनेकदा ती इच्छा पूर्ण झाली पण विमानप्रवासाची आणि एकंदर त्या तयारीची अपूर्वाई अजूनही गेली नाही. व्हिसा मिळवायची लगबग आधी सुरू होते, मग हळूहळू आतल्या खोलीत प्रवासात न्यायला म्हणून खरेदी केलं जाणारं सामानसुमान पाय पसरून बसतं आणि त्यातील मग अर्धनुर्धं बॅगेत बसत नाही, विमानाची तारीख चुकू नये म्हणून सतत तिकीट चेक करणं, प्रत्यक्ष प्रवासादिवशी झाली न झाली अशी झोप घेऊन विमानतळावर जाणं, एकदा 23 किलोच्या खाली वजन भरलं की टाकलेला निःश्वास, सिक्युरिटीत पलीकडे आपलं सगळं सामान चेक होऊन आलंय ना हे दोन दोनदा बघणं, सतत पासपोर्ट तर विसरला नाही ना हे बघायला नकळत खिशाकडे चाचपडणारा हात नि अशा अवस्थेत गेटला येऊन बसलं की मग तासभर घरी कॉल्स. आणि असे कॉल्स सुरू असतानाच मग बोर्डिंगची आरोळी ऐकू येते आणि सगळा जथ्था गेटवर मोठी रांग धरून उभा राहतो. मी आपला शेवटी जातो, एक तर आपली सीट कोणी चोरत नाही आणि रांगेत उभं ...